कार्तिक पुजारी
गणपतीला बुद्धीची देवता म्हटलं जातं. आपल्या लाडक्या गणेशाकडून आपल्याला खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत
गणपतीचे कान मोठे असतात, यातून आपल्याला एक चांगला ऐकणारा व्हायचंय हे अधोरेखित होतं
गणपतीला विघ्नहर्ता म्हटलं जातं, त्याच प्रमाणे आपण दुसऱ्यांचे दु:ख, अडचणी कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत
गणेशाचे रुप हे वेगळे आहे. जसं आपण त्याच्यावर प्रेम करतो, तसंच आपण दुसऱ्यांमध्ये भेदभाव न करता प्रेम करायला हवं
गणेश हा कोमल स्वभावाचा आणि सर्वांना हवाहवासा वाटणारा देव आहे. आपणही त्याच्या सारखे होण्याचा प्रयत्न करू शकतो
गणेशाला कोणताही अहंकार नाही, म्हणूनच तो उंदरावर बसून प्रवास करतो
आपल्याही जीवनात आपण अहंकार मुक्त असलं पाहिजे