हीरोची सर्वात प्रीमियम बाईक, कशी आहे Mavrick 440?

Sudesh

हीरो

हीरो मोटोकॉर्पने भारतातील आपली सगळ्यात प्रीमिमय बाईक लाँच केली आहे. हीरो मावरिक 440 असं या बाईकचं नाव आहे.

Hero Mavrick 440 | eSakal

इंजिन

हार्लेवर आधारीत असली, तरी या बाईकचं इंजिन हे थोडंफार बदलण्यात आलं आहे. या इंजिनची क्षमता 440cc आहे. हे सिंगल-सिलेंडर इंजिन 27hp आउटपुट देतं. याचा टॉर्क 36Nm आहे.

Hero Mavrick 440 | eSakal

गिअर

या बाईकमध्ये 6-स्पीड गिअरबॉक्स दिला आहे. यात स्लिप-एंड-असिस्ट क्लच मिळतो.

Hero Mavrick 440 | eSakal

डिझाईन

या बाईकची चाकं 17 इंचाची आहेत. यामध्ये मस्क्युलर लुक असणारा टँक आहे. बाईकचं डिझाईन अग्रेसिव्ह रोडस्टर प्रकारातील आहे.

Hero Mavrick 440 | eSakal

फीचर्स

यामध्ये 43mm टेलिस्कोपिक फोर्क वापरण्यात आला आहे. यात 320mm फ्रंट आणि 240mm रिअर डिस्क ब्रेक देण्यात आला आहे. बाईकमध्ये पूर्ण लायटिंग सेटअप दिला आहे. हेडलँपचा आकार गोल आहे. डिजिटल स्पीडोमीटरमध्ये टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, गिअर इंडिकेटर असे फीचर्स आहेत.

Hero Mavrick 440 | eSakal

किंमत

Hero Mavrcik या बाईकचे तीन व्हेरियंट लाँच करण्यात आले आहेत. यातील बेस व्हेरियंटची किंमत 1,99,000 रुपये असणार आहे. तर मिड व्हेरियंटची किंमत 2,14,000 रुपये असेल. टॉप व्हेरियंटची किंमत 2,24,000 असणार आहे.

Hero Mavrick 440 | eSakal

टक्कर

याची थेट टक्कर रॉयल एनफील्ड क्लासिक 350, ट्रायम्फ स्पीड 400, जावा 350 आणि होंडा सीबी 350 या गाड्यांशी असणार आहे.

Hero Mavrick 440 | eSakal

लवकरच लाँच होणार स्कोडाची 'इन्याक' ईव्ही, पाहा पहिली झलक

Skoda Enyaq EV | eSakal
येथे क्लिक करा