सकाळ डिजिटल टीम
मासिक पाळीच्या काळात प्रत्येक मुलीला त्रास होतो. काही मुलींचे खूप रक्त वाहते, तर काहींना खूप थकवा जाणवतो.
पोटात असह्य वेदना होत असताना हा त्रास वाढतो. अशा परिस्थितीत त्या अनेक वेळा औषधांचा अवलंब करतात. पण, ही औषधे सतत घेतल्याने शरीराला हानी होते.
मात्र, आपल्या अंगणात मिळणाऱ्या लाल फुलामध्ये या समस्येवर उपाय दडलेला आहे. या लाल फुलाच्या चहाने मासिक पाळीच्या वेदना कमी होतात.
या फुलाचं नाव जास्वंद (Hibiscus Flower) आहे. जास्वंद फुले दिसायला जितकी सुंदर असतात, तितकीच ती आरोग्यासाठी फायदेशीर मानली जातात. या फुलाचा आयुर्वेदात अनेक प्रकारच्या आजारांवर उपचार करण्यासाठी शतकानुशतके वापर केला जात आहे.
जास्वंद फुलाचा चहा आरोग्यासाठी खूप चांगला मानला जातो. जर कोणत्याही महिलेची मासिक पाळी अनियमित होत असेल, तर तिच्यासाठी हा रामबाण उपाय आहे. महिलांमध्ये मासिक पाळी नियमित ठेवण्यासाठी जास्वंद खूप फायदेशीर आहे.
महिलांच्या शरीरात Estrogen ची पातळी कमी झाल्यामुळे हार्मोन्सचे संतुलन बिघडते. त्यामुळे मासिक पाळी योग्य वेळी येत नाही. पण, जास्वंद फूल वापरल्याने मासिक पाळीत कोणतीही समस्या उद्भवत नाही.
जर तुम्हाला दीर्घकाळ वजन कमी करायचं असेल, तर यामध्ये जास्वंदचं फूल तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. यासाठी तुम्ही जास्वंदच्या पानांचा चहा घेऊ शकता. हा चहा तुम्हाला ऊर्जा तर देतोच, पण तो प्यायल्याने तुम्हाला दीर्घकाळ भूकही लागत नाही.
असह्य पोटदुखीच्या बाबतीत जास्वंद फुलाचा चहा प्या. यासाठी तुम्हाला जास्वंद कळीच्या बिया काढून रोज सकाळी रिकाम्या पोटी दोन कळ्या खाव्या लागतील. 1 आठवडा सतत याचे सेवन केल्याने तुम्हाला दुखण्यापासून खूप आराम मिळेल.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.