Saisimran Ghashi
उच्च रक्तदाब हा अनेकदा लक्षणं न देता आपल्याला धोक्यात घालणारा आजार आहे.
उच्च रक्तदाब मुख्यतः दोन प्रकारचा असतो प्राथमिक आणि दुय्यम.
याचे कारण अजूनही पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही, पण आपली जीवनशैली यात महत्त्वाची भूमिका बजावते.
हा रोग काही विशिष्ट वैद्यकीय समस्यांमुळे उद्भवतो, जसे की मधुमेह, मूत्रपिंडाचे आजार किंवा काही औषधांच्या दुष्परिणामामुळे.
उच्च रक्तदाब शांतपणे वाढत जातो आणि हळूहळू हृदय, मूत्रपिंड आणि मेंदूसारख्या महत्त्वाच्या अवयवांना नुकसान पोहोचवतो.
उच्च रक्तदाबाचे निदान लवकर झाल्यास त्यावर नियंत्रण ठेवणे शक्य होते.
निरोगी आहार, नियमित व्यायाम आणि तणाव व्यवस्थापन यांच्याद्वारे उच्च रक्तदाबावर नियंत्रण ठेवता येते.
काही प्रकरणांमध्ये उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी औषधांची गरज असते.
उच्च रक्तदाबाच्या समस्यांबाबत डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही.