Monika Lonkar –Kumbhar
सध्याचे धावपळीचे जीवन, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी अन् व्यायामाचा अभाव इत्यादी कारणांमुळे वजनवाढीसोबत इतर समस्या वाढत आहेत.
मग, हे वाढलेले वजन कमी करण्यासाठी विविध व्यायामाचे प्रकार, योगा, वर्कआऊट आणि डाएट प्लॅन्सची मदत घेतली जाते.
त्यासाठी, तुम्ही आहारात हाय प्रोटिनयुक्त पदार्थांचा समावेश करायला हवा. कोणते आहेत ते पदार्थ? चला तर मग जाणून घेऊयात.
ओट्समध्ये उच्च प्रथिने आणि फायबर्सचा भरपूर समावेश आढळून येतो.ओट्स चीलाचे सेवन केल्याने दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते.
उच्च प्रथिने, जीवनसत्वे आणि हेल्दी फॅट्सने परिपूर्ण असलेली अंडी तुम्ही दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात नक्कीच समाविष्ट करू शकता.
प्रथिने आणि कॅल्शिअमने समृद्ध असलेली पनीर भुर्जी वजन कमी करण्यासाठी एक हेल्दी आणि चवदार पर्याय असू शकतो.