सकाळ डिजिटल टीम
लिंगाणा हा रायगड किल्ल्याचा उपदुर्ग आहे
बोराट्याच्या नाळेलगत लिंगाण्याचा डोंगर आहे. आकाशात उंच गेलेला शिवलिंगासारखा त्याचा सुळका आहे.
लिंगाच्या आकाराचा हा किल्ला महाडपासून ईशान्येस सोळा मैलांवर असून सह्याद्रीच्या मुख्य रांगेत तोरणा व रायगड यांचे दरम्यान आहे.
लिंगाण्याचे खडक २९६९ फूट उंच असून त्याची चढण ४ मैल लांबीची आहे. तटबंदी पूर्ण नष्ट झाली आहे
लिंगाण्यावर जाण्यासाठी आधी लिंगणमाचीला जाऊन जननीचे आणि सोमजाईचे दर्शन घेऊन मग लिंगाण्याकडे निघतात.
रायगड जर राजगृह तर लिंगाणा हे कारागृह. इथला बेलाग सुळका आणि निसरडी माती या गोष्टी त्यासाठी अतिशय अनुकूल आहेत.
या अशा अवघड दुर्गावर स्वराज्याच्या शत्रूंना कैदेत ठेवत असत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.