Monika Lonkar –Kumbhar
हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री हिना खान सध्या कॅन्सरसोबत लढा देतेय.
मागील काही दिवसांपूर्वीच हिनाने तिला स्टेज ३ ब्रेस्ट कॅन्सर निदान झाल्याचे सोशल मीडियाद्वारे सांगितले.
नुकतेच तिने केमोथेरपीपूर्वी तिचे डोक्यावरील केस कापून टाकले. या संदर्भातील पोस्ट तिने इन्स्टाग्रामवर शेअर केली होती. आज आपण हिनाचे गाजलेले हेअरस्टाईल लूक्स जाणून घेणार आहोत.
हिना या मेस्सी बन हेअरस्टाईलमध्ये सुंदर दिसतेय. पारंपारिक किंवा वेस्टर्न अशा दोन्ही प्रकारच्या आऊटफीटवर ही हेअरस्टाईल तुम्ही ट्राय करू शकता.
स्टायलिश लूकसाठी तुम्ही हिनाप्रमाणे केसांमध्ये सॉफ्ट कर्ल्स हेअरस्टाईल करू शकता.
जर तुम्हाला मोकळे केस नको असतील तर तुम्ही हिनाप्रमाणे ही हाय बनची हेअरस्टाईल करू शकता.
पारंपारिक असो की वेस्टर्न हिना प्रत्येक लूकमध्ये तितकीच स्टनिंग दिसते.