Anuradha Vipat
अभिनेत्री हिना खानला स्टेज ३ ब्रेस्ट कॅन्सर झाल्याची माहिती समोर आली आहे.
त्यानंतर हिना उपचार घेत आहे. आता हिना पुन्हा कामावर रुजू झाली आहे.
तिने काम करताना केमो थेरपीचे टाके लपवतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
हिना खानने व्हिडिओ कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, तिच्यावर उपचार सुरू आहेत पण त्याचवेळीच तिने काम करण्यास सुरुवात केली आहे.
पुढे कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, यामुळे तिला आनंद मिळत आहे. तसेच यावेळी तिला तिची मेकअप आर्टिस्ट धीर देताना दिसत आहे.
पुढे हिना म्हणाली,बदल स्वीकारा, फरक स्वीकारा आणि त्याला दैनंदिन जीवनाचा भाग बनवा.
मी चांगल्या दिवसांची वाट पाहते आहे कारण मला जे करायला आवडते ते मला आनंद देते असं हिना पुढे म्हणाली आहे