Anuradha Vipat
अभिनेत्री म्हणजे हिना खान आता तिच्या आजारपणामुळे काही दिवसांपासून चर्चेत आहे.
इन्स्टाग्रामवर पोस्ट करीत हिनाने आपल्याला तिसऱ्या टप्प्यातील कर्करोगाचे निदान झाल्याचे सांगितले होते.
आता हिनाने पहिल्या केमोथेरेपीदरम्यानचा व्हिडीओ शेअर करीत भावनिक पोस्ट लिहिली आहे.
व्हिडीओच्या सुरुवातीला हीना रेड कार्पेटवर पापाराझींना फोटोसाठी पोझ देताना दिसत आहे
पुढे व्हिडीओमध्ये हिना पुरस्कार घेताना दिसत आहे आणि त्यानंतर ती आपल्या उपचारासाठी दवाखान्यात जाताना दिसत आहे.
“सगळी प्रसिद्धी गेली आणि आता मी माझ्या पहिल्या केमोथेरपीसाठी तयार आहे”, असे शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये हीनाने म्हटले आहे.
हीनाने शेअर केलेल्या व्हिडीओनंतर चाहत्यांसह अनेक कलाकरांनी हीनाच्या धाडसाचे कौतुक केले आहे.