धनश्री भावसार-बगाडे
बहुतेक सर्वच हिंदू मंदिरांच्या प्रवेशद्वाराजवळ किंवा गाभाऱ्याबाहेर कासवाची मूर्ती किंवा काही ठिकाणी जिवंत कासव पाळलेलं असतं. यामागे कारण काय?
भगवान विष्णूच्या दशावतारामध्ये दुसरा अवतार हा कुर्मावतार होता. त्यात त्यांनी कासवाच्या रुपात पाठीवर पृथ्वी तोलून धरली होती.
कासव खूप वर्ष जगतो. म्हणून कासवाला दीर्घायुष्याचं प्रतिक समजलं जातं.
कासव ज्याप्रमाणे आपले सर्व अवयव आत घेऊन निपचीत पडून राहतं, त्याप्रमाणे आपले षड्रीपू आपण आत खेचून देवासमोर शुद्ध स्वरुपात नीपचीत असावं.
भगवान श्री कृष्णाने भगवत् गीतेत म्हटलं आहे, कासव ज्याप्रमाणे आपली इंद्रिये आतमध्ये ओढून बाह्यजगतापासून अलिप्त होते, त्याप्रमाणे ज्ञान प्राप्त करण्यासाठी मनुष्याने इंद्रियांवर नियंत्रण मिळवणे आवश्यक असते.
वास्तूशास्त्रानुसार कासवाला शांतता आणि समृद्धीचे प्रतिक मानले जाते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.