Anuradha Vipat
अभिनेता जेसन शाह संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी’ या वेब सीरीजममुळे चर्चेत आला आहे.
आता एका मुलाखतीत आपल्या मराठमोळ्या एक्स गर्लफ्रेंडशी ब्रेकअप का झालं याचा खुलासा जेसनने केला आहे.
जेसन अनुषा दांडेकरसोबत रिलेशनशिपमध्ये होता.
अनुषासोबत ब्रेकअप झाल्यामुळे आपल्यात मोठा आध्यात्मिक बदल झाला आहे, असं जेसनने सांगितलं.
ब्रेकअप कशामुळे झालं याबद्दल तो म्हणाला की तिच्याबरोबर रिलेशनशिपमध्ये येण्यास त्याच्याकडून घाई झाली आणि अनुषा त्याला खरोखर समजू शकली नाही.
अनुषा व त्याचं नातं तुटण्यासाठी गैरसंवाद कारणीभूत असल्याचंही जेसनला वाटतं