आशुतोष मसगौंडे
पुण्यातील नारायण पेठेत 1800 सालच्या सुरुवातीला मोदी गणपती मंदिर बांधण्यात आले आहे.
लोककथेनुसार खुश्रुशेठ मोदींच्या बागेत स्वयंभू मूर्ती सापडली, म्हणून त्याला मोदी गणपती असे नाव देण्यात आले.
खुश्रुशेठ मोदी त्यावेळी पेशवे आणि इंग्रज यांच्यामध्ये अनुवादक म्हणून काम करत होते.
मंदिर त्याच्या साध्या पण मोहक वास्तुकलेमुळे आपल्याला आजही त्या काळात घेऊन जाते.
मोदींच्या बागेजवळ श्रीगणेशाची स्वतः प्रकट झालेली मूर्ती सापडली, म्हणून त्याला मोदी गणपती असे नाव पडले .
या मोदी गणपतीला बोंबल्या गणपती म्हणूनही ओळखले जाते. पण खूप कमी जणांना याबाबत माहिती आहे.
या मंदिराच्या सभामंडपातील भिंतीवर श्रीगणेशाचे विविध अवतार दाखवण्यात आले आहेत.
या मंदिराचे बांधकाम रत्नागिरीतून पुण्यात स्थायिक झालेल्या एका भट नावाच्या व्यक्तीने 1811 मध्ये केले आहे.
या मंदिरात आधी फक्त गाभार आणि कळसाचे बांधकाम करण्यात आले होते. त्यानंतर 1868 मध्ये लाकडाचा सभा मंडप बांधण्यात आला.