होळीसाठी रंग खरेदी करताय? मग, 'या' गोष्टींची घ्या खास काळजी

Monika Lonkar –Kumbhar

होलिका दहन

फाल्गुन शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या रात्री होलिका दहन केले जाते आणि दुसऱ्या दिवशी सगळीकडे विविध रंग खेळले जाते. 

होलिक दहन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लोक एकमेकांना रंग लावतात आणि धूलिवंदनाच्या शुभेच्छा देतात.

होळीच्या निमित्ताने विविध रंगांची खरेदी केली जाते. बाजारात विविध प्रकारचे रंग आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पिचकारींनी बाजारपेठ सजलेली पहायला मिळत आहे.

परंतु, होळीचे हे रंग खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. 

केमिकल्सने युक्त असलेले रंग खरेदी करू नका. कारण, या रंगांमुळे त्वचेचे आणि केसांचे नुकसान होण्याची शक्यता असते.

नैसर्गिक रंग आणि केमिकलयुक्त रंगांमध्ये ओळख पटवणे कठीण होऊन बसते. अशावेळी एक गोष्ट लक्षात ठेवा. ती म्हणजे नैसर्गिक रंगांना चमक कमी असते.

याउलट केमिकलयुक्त रंगांना चमक जास्त असते. ज्यामुळे, ते अधिक चकचकीत दिसतात. परंतु, तुम्ही याला बळी पडू नका आणि नैसर्गिक रंग खरेदी करा.

स्ट्रेचिंगसाठी आणि वेदना कमी करण्यासाठी उपयुक्त आहे धनुरासन

येथे क्लिक करा.