Monika Lonkar –Kumbhar
रंगांचा उत्सव म्हणून ओळखला जाणारा होळी हा आनंदाचा सण आहे.
हिंदू धर्मात होळी या सणाला विशेष महत्व आहे.
दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला हा सण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे, या सणाला भारतात विशेष असे महत्व आहे.
होळीच्या दिवशी वापरल्या जाणाऱ्या विविध रंगांचे खास असे महत्व आहे. यातील प्रत्येक रंगाला धार्मिक आणि वैज्ञानिक असे महत्व आहे.
होळीच्या दिवशी लाल रंगाचा सर्वाधिक वापर केला जातो. हा लाल रंग ऊर्जा, प्रेम, उत्साह आणि विजयाचे प्रतिक मानला जातो.
भगवान श्रीकृष्ण यांचे रूप निलांबर आहे. त्यामुळे, होळीच्या दिवशी या निळ्या रंगाचे खास असे महत्व आहे. हा निळा रंग विश्वास,शक्ती आणि प्रेम यांचे प्रतिक आहे.
होळीच्या दिवशी या गुलाबी रंगाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. हा गुलाबी रंग दयाळूपणा, मैत्री आणि इतरांची काळजी घेण्याचे प्रतिक मानले जाते. होळीला या गुलाबी रंगाचा वापर लोक मोठ्या प्रमाणात करतात.
भारतीय संस्कृतीमध्ये या पिवळ्या रंगाला विशेष असे महत्व आहे. कारण, भारतातील प्रत्येक शुभ कार्याची सुरूवात ही पिवळ्या रंगाने केली जाते. शिवाय, हा पिवळा रंग शांती, समृद्धी आणि आरोग्याचे प्रतिक आहे.