होळीच्या दिवशी आगीत 'या' गोष्टी करा अर्पण, आर्थिक अडचणी होतील दूर

Monika Lonkar –Kumbhar

होळी

यंदाच्या वर्षी २४ मार्च रोजी होळी आहे. होळीला पुरणाची पोळीचा नैवेद्य केला जातो. गल्लीत अन् दारात होळी पेटवली जाते.

मनातील वाईट विचार या होळीत जाळून टाकले जातात, अशी मान्यता आहे. त्यामुळे, होळी हा सण वाईटावर चांगल्याचा विजय याचे प्रतिक मानला जातो. होळीला काही गोष्टी अर्पण केल्याने तुमच्या अनेक अडचणी दूर होऊ शकतात.

नागिणीची पाने

नागिणीची पाने तुमच्यासाठी वरदान ठरतील. होळीच्या आगीत नागिणीच्या पानांना तूपात भिजवून अर्पण करा. याने आर्थिक संकट दूर होते आणि पैशाची कमतरता भासत नाही. 

नारळ

होळी समोर नारळ फोडून त्यामध्ये गूळ आणि अळशीचे बी भरावेत,आणि तो होळीला अर्पण करावा.  

कापूर आणि कडुलिंबाची पाने

उत्तम आरोग्यासाठी होळीच्या आगीत कापूर आणि कडुलिंबाची पाने टाकणे शुभ असते. 

चंदन

जीवनात सुख-शांतीची इच्छा पूर्ण करण्यासाठी होळी दहनात चंदनाची लाकडेही घालावीत. असे केल्याने तुम्ही जीवनात सतत येणाऱ्या समस्यांवर मात करू शकता.

गहू आणि ज्वारी

होळीच्या दिवशी होलिका दहनाच्या अग्नीत गहू आणि ज्वारी अर्पण करावेत. असे केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.

लॅक्मे फॅशन वीकमध्ये गाजला बॉलिवूड अभिनेत्रींचा सुपरहीट अंदाज

lakme Fashion week 2024
येथे क्लिक करा.