Monika Lonkar –Kumbhar
सध्या देशातील अनेक भागांमध्ये प्रचंड उकाडा जाणवत आहे.
वाढत्या उष्णतेमुळे लोक हैराण झाले आहेत.
या दिवसांमध्ये शरीराला थंड ठेवण्यासाठी आरोग्याची खास काळजी घ्यावी लागते.
वाढत्या उष्णतेमुळे त्वचेवर खाज येणे, रॅशेस येणे, घामोळ्या येणे इत्यादी समस्या सुरू होतात.
घामोळ्यांपासून आराम मिळवण्यासाठी थंड पाण्याने अंघोळ करा.
घामोळ्यांपासून बचाव करण्यासाठी झोपण्यापूर्वी त्वचेवर नारळाचे तेल लावा. या तेलाचा नियमित वापर केल्याने उष्माघातापासून आराम मिळू शकेल.
सूती कपड्यांमुळे, तुम्हाला घामोळ्यांचा त्रास जाणवणार नाही. त्यामुळे, सूती कपडे घाला.