Saisimran Ghashi
मासिक पाळी दरम्यान वेदना सहन करणं ही अनेक महिलांची मोठी समस्या आहे.
पण औषधांशिवायही काही घरगुती उपाय आहेत जे तुमच्या या पाळीतील वेदना कमी करण्यास मदत करतील.
तणाव आणि पोटाला होणारा त्रास कमी करणारा चहा बनवायचा असेल तर आलं आणि मिरपूड एकत्र वापरा. चव वाढवण्यासाठी थोडा मधही टाकू शकता.
तिळाच्या तेलात लिनोलिक आम्ल असतं जे जळजळ रोखण्यास आणि वेदना कमी करण्यास मदत करते. पाठीच्या आणि पोटाच्या खालच्या बाजूला मालिश करा.
मेथी दाणे पाण्यात काही तास भिजवून ते पाणी प्यायल्यास वेदना कमी होते.
जिरे हिवाळ्यामध्ये खासकरुन उपयुक्त असते. म्हणूनच जिरे खाल्यास वेदना कमी होते आणि मासिक पाळीच्या वेदनांपासूनही आराम मिळतो.
योगासनं मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहे. पेल्विक भागात रक्तप्रवाह वाढवून ते वेदना कमी करते. शवासनसारखी सोपी आसनंही फायदेशीर ठरतात.
गरम पाण्याची पिशवी पोटाला लावणे हा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय आहे. गरम पाणी पिणं आणि आंघोळ करणंही फायदेशीर आहे.
हळदीत अनेक गुणधर्म आहेत तर जायफळ कोणत्याही वेदना कमी करते. या दोन्हीचं मिश्रण गरम दुधात घालून प्यायल्यास वेदना कमी होण्याबरोबर झोपही चांगली येते.
या काही सोप्या उपायाने तुम्ही मासिक पाळीत होणाऱ्या त्रासापासून सुटका मिळवू शकता.