वॅक्सिंगनंतर आलाय लालसरपणा? आराम मिळवण्यासाठी करून पहा हे उपाय Skin Care

Aishwarya Musale

फेस वॅक्सिंग

फेस वॅक्सिंग केल्यानंतर त्वचेवर लालसरपणा दिसत असेल तर तुम्ही काही सोप्या घरगुती उपायांची मदत घेऊ शकता. ते कोणत हे पाहू.

skin | sakal

बर्फाने शेका

चेहऱ्यावरील लालसरपणा दूर करण्यासाठी चेहरा बर्फाने शेकू शकता. त्यासाठी एका सुती कापडात बर्फ गुंडाळा व त्याने चेहऱ्याला हलक्या हाताने मसाज करा.

skin | sakal

कोरफडीचे जेल वापरू शकता

वॅक्सिंग केल्यानंतर चेहऱ्याच्या किंवा शरीराच्या कोणत्याही भागावर तुम्हाला लालसरपणा दिसत असेल तर तुम्ही कोरफडीचा वापर करू शकता.

skin | sakal

कोरफड

कोरफडीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात व त्यामुळे त्वचेलाही थंडावा मिळतो. तसेच त्यातील अँटीसेप्टिक घटकांमुळे सूज आणि पुरळ यापासून आराम मिळतो.

skin | sakal

हळद व मध गुणकारी

वॅक्सिंग केल्यानंतर त्वचा लालसर झाली असेल तर मध व हळदीचा लेप लावा. या दोहोंमध्येही अँटीबॅक्टेरिअल व अँटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात.

skin | sakal

पाण्याने स्वच्छ धुवा

सूज व वेदना कमी करण्यासाठी हा लेप थोडा वेळा लावून ठेवा. साधारण अर्ध्या तासाने चेहरा साध्या पाण्याने स्वच्छ धुवा. काही लोक लिंबाचाही वापर करतात.

skin | sakal

काकडी ठरेल उपयुक्त

काकडीमध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात. चेहऱ्यावर लालसरपणा असेल तर काकडीचे पातळ काप करावेत व ते चेहऱ्यावर ठेवा.

skin | sakal

गुलाब जलही उपयोगी ठरेल

वॅक्सिंग नंततर चेहऱ्याचा लालसरपणा कमी करण्यासाठीही ते फायदेशीर ठरते. गुलाब जल फ्रीजमध्ये ठेून थंड करावे व कापसाच्या मदतीने ते चेहऱ्यावर लावावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

skin | sakal