सकाळ डिजिटल टीम
तणाव आणि प्रदूषणामुळे चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स दिसू लागतात. हे नाकावर जास्त असतात. ते काढण्यासाठी महागडी उत्पादने वापरण्याऐवजी तुम्ही घरगुती पद्धतींचा वापर करू शकता. चला या पद्धती जाणून घेऊयात.
ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी एक चमचा ओट्समध्ये दही मिसळा. त्यात लिंबाचा रस घाला आणि नाकाला २ मिनिटे मसाज करा.
चण्याचं पीठ पाण्यामध्ये मिसळून ब्लॅकहेड्स असलेल्या भागावर लावा. यानंतर ते थोडे सुकल्यावर हाताने चोळा.
साखर आणि मध मिसळून स्क्रब बनवता येतो. हे नाकावर लावल्याने ब्लॅकहेड्स दूर होतात.
टूथपेस्टच्या मदतीने ब्लॅकहेड्स नाहीसे होऊ शकतात. त्यात थोडे मीठ मिक्स करून नाकावर लावा आणि कोरडे झाल्यानंतर हलक्या हाताने मसाज करा. नंतर पाण्याने धुवा.
मधात लिंबू मिसळून नाकाला लावा. काही वेळ ठेवल्यानंतर कोमट पाण्याने धुवा.
ब्लॅकहेड्स असलेल्या भागावर केळीची साल लावा आणि चोळा व काही काळ असेच राहू द्या. त्यानंतर ते पाण्याने धुवा.
खोबरेल तेलात हळद मिसळून लावल्याने ब्लॅकहेड्सपासून सुटका मिळते.