धनश्री भावसार-बगाडे
तुम्हीही धान्य-पिठात होणाऱ्या किड्यांमुळे हैराण असाल तर, या ट्रिक्स तुमच्यासाठी उपयुक्त आहेत.
किडे काढण्यासाठी तुम्ही पीठाची बारीक चाळणी वापरू शकता. जर तुम्हाला पीठ लवकर स्वच्छ करायचे असेल तर मोठी चाळणी वापरणे चांगले.
संपूर्ण पीठ सकाळपासून संध्याकाळपर्यंत कडक सूर्यप्रकाशात ठेवावे. किटक उष्णता सहन करू शकत नाहीत आणि ते बाहेर पडतात.
पीठ किड्यांपासून वाचवायचे असेल तर तुम्ही त्यात मीठ मिसळा. त्यामुळे पिठात किडे आणि कीड येणार नाहीत आणि ते पूर्णपणे ताजे राहील.
जेव्हा तुम्ही पीठ साठवाल तेव्हा डब्यात लवंग टाकण्याचा प्रयत्न करा. यामुळे किडे टाळता येतील आणि पीठ ताजे राहील.
पीठ ताजे ठेवण्यासाठी तुम्ही कडुलिंबाची पाने देखील वापरू शकता. डब्यात कपड्यात कडुलिंबाची पाने बांधून ठेवू शकता.
प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये पीठ कधीही ठेवू नका. ते साठवण्यासाठी तुम्ही स्टील किंवा ॲल्युमिनियम कंटेनर वापरू शकता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.