Monika Lonkar –Kumbhar
ग्रीन टी पिणे हा अनेकांच्या जीवनशैलीचा एक महत्वाचा भाग झाला आहे. ग्रीन टी पिण्याचे आपल्या आरोग्याला भरपूर फायदे होतात.
वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी पिणे हे अतिशय फायदेशीर मानले जाते.
ग्रीन टी त्वचेसाठी देखील लाभदायी आहे. ग्रीन टी मध्ये मोठ्या प्रमाणात पोषकघटक उपलब्ध असतात. या पोषकघटकांमध्ये पॉलिफेनोल्स नावाचे एक अॅंटीऑक्सिडंट्स असते, जे त्वचा हायड्रेटेड आणि चमकदार ठेवण्यास मदत करते.
हा फेस पॅक बनवण्यासाठी एका भांड्यात २-३ चमचे तांदळाचे पीठ घ्या. त्यामध्ये २ चमचे ग्रीन टी आणि १ चमचा लिंबाचा रस मिसळा. याची छान पेस्ट बनवून घ्या.
तुमचा फेस पॅक तयार आहे. हा फेस पॅक चेहऱ्यावर २० मिनिटांसाठी ठेवा आणि चेहरा धुवून टाका.
ग्रीन टी आणि हळदीपासून बनवला जाणारा हा फेसपॅक सर्व त्वचा प्रकारांसाठी वापरला जाऊ शकतो. ग्रीन टी सोबतच हळद त्वचा उजळण्यास मदत करते.
हा फेस पॅक करण्यासाठी एका बाऊलमध्ये २ चमचे बेसन, अर्धा चमचा हळद आणि ग्रीन टी मिक्स करा. याची छान पेस्ट करून चेहऱ्यावर लावा. १५-२० मिनिटांसाठी हा फेस पॅक चेहऱ्यावर ठेवा. त्यानंतर, चेहरा धुवून टाका.