केळीच्या पानावर जेवणे आरोग्यासाठी किती फायदेशीर? कोणते आजार होतात दूर?

सकाळ डिजिटल टीम

केळीच्या पानाचे कोणते फायदे?

केळीच्या पानांवर अन्न देणे भारतात अनेक वर्षांपासून प्रचलित आहे. दक्षिण भारतात बरेच लोक केळीची पाने खाण्यासाठी वापरतात.

Banana leaves Benefits

आरोग्यासाठी फायदेशीर

दक्षिणेतील लोक भांड्यांऐवजी केळीच्या पानांवर खातात. हे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. शिवाय, ही पद्धत अनेक आजारांपासून दूर राहण्यासही उपयुक्त ठरू शकते.

Banana leaves Benefits

हानिकारक जीवाणू करतात नष्ट

केळीच्या पानांमध्ये नैसर्गिक Antimicrobial गुणधर्म असतात, जे अन्नातील हानिकारक जीवाणू नष्ट करण्यास मदत करतात. म्हणून, केळीच्या पानांवर अन्न खाल्ल्याने अन्नजन्य (अन्न विषबाधा) रोगांचा धोका कमी होतो.

Banana leaves Benefits

केळीच्या पानांत कोणते घटक?

केळीच्या पानांमध्ये Polyphenols, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी सारखे अनेक आवश्यक पोषक घटक असतात. केळीच्या पानावर अन्न ठेवल्यावर यातील काही पोषक द्रव्ये अन्नामध्ये जातात, ज्यामुळे त्याचे पोषण वाढते.

Banana leaves Benefits

केळीची पाने बिनविषारी

काही Synthetic Plates किंवा केळीची पाने बिनविषारी असतात. ते अन्नामध्ये हानिकारक रसायने सोडत नाहीत, ज्यामुळे अन्न सुरक्षित राहते आणि आरोग्यास कोणतेही नुकसान होत नाही.

Banana leaves Benefits

पचनक्रियेवर चांगला परिणाम

केळीच्या पानांवर अन्न खाल्ल्याने पचनक्रियेवर चांगला परिणाम होतो.

Banana leaves Benefits

पर्यावरण अनुकूल

Disposable Plates ऐवजी तुम्ही केळीची पाने वापरू शकता. त्यामुळे पर्यावरणपूरक बनण्यास मदत होते. यामुळे प्लास्टिक किंवा फोम प्लेट्सची गरज कमी होते.

Banana leaves Benefits

आरोग्यासाठी वरदान

प्लास्टिकच्या भांड्यांमध्ये गरम अन्न दिल्याने प्लास्टिकचे काही कण अन्नात जातात. याचा आरोग्यावर परिणाम होतो. मात्र, केळीच्या पानांमध्ये अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आढळतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

Banana leaves Benefits

महिनाभर खजूर खाल्ल्यास 'या' समस्या पूर्णपणे दूर होतील; जाणून घ्या फायदे

Health Benefits Of Eating Dates | esakal
येथे क्लिक करा