सकाळ डिजिटल टीम
अंजीर हे एक अतिशय फायदेशीर ड्रायफ्रूट आहे. ज्याच्या रोजच्या सेवनाने आपल्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. हे खाल्ल्याने अपचनाची समस्या दूर होते आणि आपले हृदयही निरोगी राहते.
अनेकांना अंजीर रात्रभर भिजवून सकाळी रिकाम्या पोटी खाणे आवडते; पण अनेकांना अंजीर भिजवण्याची योग्य पद्धत माहीत नाही.
अंजीर खाल्ल्यानंतर तुम्हाला तुमच्या शरीरासाठी दुहेरी फायदे हवे असतील, तर अंजीर भिजवण्याची योग्य पद्धत जाणून घ्या..
अंजीर भिजवण्यापूर्वी ते स्वच्छ पाण्याने चांगले धुवा आणि नंतर भिजवा. त्यामुळे त्यावर साचलेला घाणीचा थर निघून जातो. बरेच लोक अंजीर न धुता भिजवतात, त्यामुळे शरीराला ड्रायफ्रूटचा पूर्ण फायदा मिळत नाही.
अंजीर खाल्ल्याने अपचन, बद्धकोष्ठता इत्यादीपासून आराम मिळतो. यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते आणि ते प्रीबायोटिकसारखे काम करते.
जर कोणाला अपचनाचा त्रास होत असेल, तर सकाळी रिकाम्या पोटी अंजीराचे तीन-चार भिजवलेले तुकडे खावेत. तसेच अंजीर खाल्ल्याने हृदय मजबूत होते. यामुळे रक्तदाब संतुलित राहतो.
अंजीरचा ग्लायसेमिक इंडेक्स खूपच कमी असतो, याच्या सेवनाने रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
ज्यांना अॅलर्जीची समस्या आहे किंवा ज्यांची त्वचा कोरडी आहे, त्यांच्यासाठी अंजीर खाणे खूप फायदेशीर ठरते. एका संशोधनात असं दिसून आलंय, की अंजीरापासून बनवलेले क्रीम लावल्याने त्वचा निरोगी राहते.