Sandip Kapde
१७०२ साली देवगडचे शासक बख्त बुलंद शहा यांनी नागपूर शहराची स्थापना केली.
गढ-मांडला आणि देवगड या प्रदेशांचे राजे असलेल्या बख्त बुलंद शहा यांनी त्यांच्या राजधानीचे स्थलांतर करायचे ठरवले.
तेव्हा नवीन ठिकाण शोधताना कान्हन नदीच्या जवळ नाग नदीच्या किनाऱ्यावरील जागा त्यांना पसंत पडली, आणि त्यांनी तिथे नव्या राजधानीची निर्मिती सुरू केली.
शहर नाग नदीच्या किनारी असल्यामुळे त्याला "नागपूर" असे नाव देण्यात आले.
शहर वसवल्यानंतर गोंड राजांप्रमाणे तलावांचे बांधकाम सुरू करण्यात आले.
यात नागपूरच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण असलेल्या अंबाझरी तलावाचा समावेश होतो.
नाग नदीवर पाळ बांधून हा तलाव उभारण्यात आला.
१७३९ मध्ये रघुजी भोसले यांनी विदर्भ भागावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आणि नागपूरला भोसले घराण्याचे राज्य सुरू झाले.
भोसल्यांच्या काळात नागपूर शहराची मोठ्या प्रमाणात प्रगती झाली.
नागपूरचे पहिले राजा रघुजी भोसले यांच्या मुलाने, बिंबाजी भोसले यांनी १७३९-५८ या काळात नाग नदीवरील तलावाचे सुशोभिकरण केले.
तलावाच्या पाळीची उंची वाढवून अधिक पाणी साठवण्यासाठी योग्य व्यवस्था केली.