Sandip Kapde
पुण्यातील सार्वजनिक वाहतूक सेवा वर्षानुवर्षे प्रगत होत गेली आहे.
१९४० च्या काळात टांगा म्हणजेच घोडागाडी हेच प्रमुख प्रवासी वाहन होते.
पुणे महापालिकेने प्रवासी वाहतुकीचे आधुनिकीकरण करण्याचा निर्णय घेतला.
सिल्व्हर ज्युबिली मोटर्सला चार मार्गांसाठी २० बसेस चालवण्याची परवानगी मिळाली तेव्हा पुण्यात बस सेवा सुरू झाली.
१९४८ पर्यंत बसगाड्यांची संख्या ४६ वर पोहोचली होती.
१९५० मध्ये पुणे महानगर पालिकेची स्थापना झाल्यावर त्यांनी स्वत:ची बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला.
१९६० मध्ये १४ मार्गांवर ५७ बसेस कार्यरत होत्या, आणि हळूहळू या सेवेत वाढ होत गेली.
पिंपरी-चिंचवड परिसरात १९७४ साली ८ बसेससह प्रवासी सेवा सुरू करण्यात आली.
पिंपरी येथे पहिला बस डेपो उघडला गेला, तर दुसरा डेपो भोसरी येथे १९८८ मध्ये स्थापन करण्यात आला.
या उपक्रमामध्ये १०१ बसेसच्या ताफ्यासह १३ मार्गांवर प्रवासी सेवा दिली जात होती.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांसाठी वाहतूक सेवा सुधारण्यासाठी दोन्ही परिवहन उपक्रमांचे एकत्रीकरण करण्यात आले.
पुणे महानगर परिवहन महामंडळाची स्थापना १९५६ च्या कायद्याअंतर्गत करण्यात आली.
१९ ऑक्टोबर २००७ रोजी पीएमपीएमएलला एकत्रित प्रवासी वाहतूक सेवा सुरू करण्याची परवानगी मिळाली.
त्यानंतर पीएमपीएमएल ही वाहतूक सेवा देणारी एक विश्वासार्ह संस्था बनली.
आज पुण्यातील प्रवासी बस सेवा स्थानिक नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण दुवा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.