Sudesh
एखादी वेबसाईट उघडताना कित्येक वेळा तुम्हाला 'I Am Not A Robot' या चेक बॉक्सवर क्लिक करावं लागतं. याला CAPTCHA किंवा reCAPTCHA म्हणतात.
ही खरंतर एक चाचणी असते, हे तपासण्यासाठी की तुम्ही खरंच एखादी व्यक्ती आहात, की एखादा बॉट.
स्पॅमर्स किंवा हॅकर्स विविध प्रकारचे बॉट्स वापरून वेबसाईट्सवरील डेटा चोरण्याचा प्रयत्न करतात. त्यांना दूर ठेवण्यासाठीच हा फिल्टर लावलेला आहे.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, की वेबसाईटला कसं कळतं आपण माणूसच आहे? एखादा रोबोट या टिकमार्कवर क्लिक का नाही करू शकत?
तुम्हाला जेव्हा बॉक्स टिक करण्यास सांगण्यात येतं, तेव्हा कॅप्चा सिस्टीम खरंतर तुमच्या माऊसची हालचाल टिपत असतं.
एखादा रोबोट किंवा बॉट देखील हा चेकबॉक्स टिक करू शकतो. मात्र बॉट्स जेव्हा माऊस पॉइंटर फिरवतात तेव्हा ते सरळ रेषेत जातात. याउलट एखाद्या व्यक्तीने फिरवलेला माऊस पॉइंटर हा कसाही वेडावाकडा असू शकतो.
तुम्ही चेकबॉक्स क्लिक केल्यानंतर देखील जेव्हा सिस्टिमला खात्री पटत नाही, तेव्हा ती तुम्हाला काही फोटो दाखवते, आणि त्यातील विशिष्ट फोटो (उदा. ट्रॅफिक लाईट्स) क्लिक करायला सांगते.
तज्ज्ञांच्या मते, या फोटोंच्या माध्यमातून देखील सिस्टीम तुमचा माऊस कर्सर कशा प्रकारे फिरतो आहे हे पाहतं.
काही सायबर तज्ज्ञांच्या मते गुगलची कॅप्चा सिस्टीम तुमची वेब हिस्ट्रीदेखील पाहू शकते. यावरुन देखील तुम्ही खरंच एखादी व्यक्ती आहात की रोबोट याचा अंदाज लावला जातो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.