भेसळयुक्त तेलाचे आरोग्यावर 'काय' होतात परिणाम ?

ऋषिकेश साळवी (Rushikesh Salvi)

तेल जर भेसळयुक्त असेल तर अतिसार, अपचन, खोकला, घसा खराब होतो

छोटे उद्योजक खर्च वाचविण्यासाठी एकाच तेलात पदार्थ वारंवार तळतात, ते आरोग्यासाठी घातक असते.

तेलावर विविध केमिकल्स मिसळून प्रक्रिया केली जाते, त्यामुळे आरोग्यावर हानिकारक परिणाम होतात.

तेलांमध्ये ट्रान्स फॅट नावाचे हानिकारक फॅट जास्त प्रमाणात असतात.

ट्रान्स फॅट हे रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवते, ज्यामुळे वाढतो हृदयविकाराचा धोका

तेल वारंवार गरम केल्याने त्यातून धोकादायक वायू बाहेर पडतो तर हायड्रॉपेरॉक्साइड, अल्डीहाईडसारखे हानिकारक रसायन तयार होते, ते शरीरातील पेशींना नुकसानकारक असते.

भेसळयुक्त तेलाच्या सेवनाने मानसिक ताण, फुफ्फुस आणि आतड्यांचा कर्करोग होण्याचा धोका