Saisimran Ghashi
टुथब्रश हा आपल्या दैनंदिन वापरतील अत्यंत महत्वाची दात साफ करणारी वस्तू आहे.
पण तुम्हाला माहिती आहे काय की नेमक्या किती दिवसांनी किंवा महिन्यांनी टुथब्रश बदलावा?
चला तर मग जाणून घेऊया.
जुना टूथब्रश जीवाणू आणि प्लाक जमा करू शकतो, ज्यामुळे दात आणि हिरड्यांना समस्या उद्भवू शकतात.
जर ब्रिस्टल्स वाकलेले, खराब झालेले किंवा पातळ झालेले असतील तर लवकर बदला.
दर 2 ते 3 महिन्यांनी तुमचा टूथब्रश बदला. लहान मुलांसाठी दर 2 महिन्यांनी बदला.
आजारी असताना तुम्ही वापरलेला टूथब्रश दुसऱ्या व्यक्तीसोबत शेअर करू नका.
मऊ आणि पातळ ब्रिस्टल्स असलेला टूथब्रश निवडा.
टूथब्रश प्रत्येक वापरानंतर स्वच्छ पाण्याने धुवा आणि ते कोरडे ठेवा.
नियमितपणे डेंटिस्टला भेटा आणि तुमच्या दात आणि हिरड्यांची तपासणी करून घ्या.
टूथब्रश बदलणे आणि योग्यरित्या ब्रश करणे तुमच्या तोंडाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे.