बदाम खाणं फायद्याचं, मात्र प्रमाणापेक्षा जास्त खाल्लं तर होईल नुकसान...

Aishwarya Musale

भिजवलेले बदाम

भिजवलेले बदाम खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. एका दिवसात आवश्यकतेपेक्षा जास्त बदाम खाल्ल्याने आरोग्याला फायद्याऐवजी हानी होऊ शकते.

खाण्याची योग्य पद्धत

दिवसभरात किती बदाम खावेत आणि ते खाण्याची योग्य पद्धत कोणती आहे याबद्दल जाणून घेऊया.

दोन बदामाने सुरुवात करा. 2 बदाम रात्रभर भिजवून सकाळी सोलून खा.

जेव्हा तुम्ही दिवसातून 2 बदाम खायला सुरुवात करता आणि जेव्हा ते नीट पचायला लागते, तेव्हा 1 आठवडा-10 दिवसांनी 5 बदाम खायला सुरुवात करा.

जर तुम्हाला सूज किंवा अपचन होत असेल तर बदामांची संख्या वाढवू नका.

तज्ज्ञांच्या मते, बदामांची संख्या हळूहळू वाढवून तुम्ही दररोज 10 बदाम खाण्यास सुरुवात करू शकता.

जर तुम्ही 90 दिवस सतत 10 बदाम खाल्ले तर तुम्हाला अनेक आरोग्य फायदे मिळू शकतात.

ज्या लोकांची पचनशक्ती चांगली आहे, ते रोज व्यायाम करतात, योग्य प्रमाणात पाणी पितात, तर तुम्ही रोज 20 बदाम खाऊ शकता.

चला आपणच निवडूया आपला ‘शहर पक्षी’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

येथे क्लिक करा