कार्तिक पुजारी
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज रशियाच्या दौऱ्यावर जात आहेत. भारत आणि रशियामधील नाते खूप जुनं आहे.
किती भारतीय नागरिक रशियामध्ये राहतात? तसेच भारतीय रशियात जाऊन प्रामुख्याने कोणतं काम करतात हे आपण जाणून घेऊया.
विदेश मंत्रालयाच्या वेबसाईटनुसार, रशियामध्ये ६२८२५ भारतीय राहतात. यामध्ये ६०१७२ एनआरआय, २६५३ भारतीय वंशाचे लोकांचा समावेश होतो.
रिपोर्टनुसार, रशियात जवळपास १५००० भारतीय विद्यार्थी आहेत. ते प्रामुख्याने वैद्यकीय शिक्षण घेत आहेत.
सुरक्षितता, व्हिसा सहज मिळणे आणि इंग्रजीमध्ये शिक्षण यामुळे भारतीय विद्यार्थी रशियाला पसंती देत आहे.
व्यवसाय करण्यासाठी आणि फार्मास्युटिकल कंपनीत काम करण्यासाठी भारतीय मोठ्या प्रमाणात रशियात जातात.
याशिवाय बांधकाम क्षेत्र, तंत्रज्ञान, फायनान्स, मॅन्युफॅक्चरिंग आणि एनर्जी सेक्टरमध्ये भारतीय काम करत आहेत.