Aishwarya Musale
आज-काल बहुतेक लोक त्यांच्या चेहऱ्याला आणि बॉडीला स्क्रबिंग करताना दिसतात. यामध्ये फक्त महिलाच नाही तर पुरुष देखील स्किन केअर साठी स्क्रबिंग करत असतात. वाढतं प्रदूषण, सन टॅनिंग अशा गोष्टींमुळे आपली स्किन टॅन होऊन जाते.
तसेच ब्लॅकहेडची समस्या देखील अनेकांना सतावत असते. अशावेळी लोक स्क्रबिंग करताना दिसतात. स्क्रबिंग केल्यामुळे स्किन टॅनिंग, ब्लॅक हेड्स दूर होण्यास मदत होते आणि स्किन उजळते. त्यामुळे स्क्रबिंग करणे खूप गरजेचं असतं.
बहुतेक लोकांची स्किन सेन्सेटिव्ह असते. तर ज्या लोकांची स्किन सेन्सेटिव्ह असेल अशा लोकांनी स्क्रबिंग जास्त प्रमाणात करू नये. नाहीतर त्यांच्या स्किनसाठी हानिकारक ठरू शकते.
ज्या लोकांची स्किन सेन्सेटिव्ह आहे अशा लोकांनी आठवड्यातून एकदाच स्क्रबिंग करणे गरजेचे आहे. त्यांनी जर जास्त वेळा स्क्रबिंग केलं तर त्यांच्या स्क्रीनवर रॅशेस पडणे किंवा स्किन लाल होणे अशा अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
ज्या लोकांची नॉर्मल स्किन असते असे लोक आठवड्यातून दोन ते तीन वेळा स्क्रबिंग करू शकतात.
नॉर्मल स्किन असलेल्या लोकांना ब्लॅकहेडची समस्या असते तर अशा लोकांनी आठवड्यातून दोन ते तीन वेळा स्क्रबिंग करणे गरजेचे आहे.
जेव्हा तुम्ही स्क्रबिंग करता त्याच्यानंतर चेहऱ्याला आणि तुमच्या बॉडीला मॉइश्चरायझर लावायला विसरू नका.
मॉइश्चरायझर आपल्या ओपन पोर्स पर्यंत जाते त्यामुळे आपली स्किन मॉइश्चरायझ होते आणि स्किन उजळण्यास देखील मदत होते. त्यामुळे स्क्रबिंग नंतर मॉइश्चरायझर लावणं फायदेशीर ठरतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.