एव्हरग्रीन रेखा यांची एकूण संपत्ती किती ? अभिनय करत नसल्या तरी इथून कमावतात पैसे

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री रेखा या एव्हरग्रीन व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जातात. रेखा यांनी बऱ्याच बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केलं आहे. पण बराच काळ त्या अभिनयापासून दूर आहेत.

रेखा यांनी १ ८ ० हुन अधिक सिनेमांमध्ये काम केलं आहे. पण त्यांनी तेलुगू सिनेसृष्टीतून पदार्पण केलं. अगदी वयाच्या पहिल्या वर्षापासून त्यांनी बालकलाकार त्यांनी काम केलं. १ ९ ७ ० मध्ये त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

‘उमराव जान’, ‘सिलसिला’, ‘मिस्टर नटवरलाल’, ‘मुकद्दर का सिकंदर’ असे त्यांचे अनेक सिनेमे खूप गाजले.

पण आता रेखा सिनेमांमध्ये काम करत नाहीत पण तरीही त्या कायम चर्चेत असतात. सिनेमात काम करत नसल्या तरीही त्यांची कमाई कोणत्या माध्यमातून होते असा प्रश्न अनेकांना पडतो.

रेखा अनेक कार्यक्रमांना आणि मोठ्या इव्हेंट्सना पाहुण्या म्हणून हजेरी लावतात यातून त्यांना मानधन मिळत तसंच त्यांच्या मुंबई आणि दक्षिण भारतात अनेक मालमत्ता आहेत आणि त्या त्यांनी भाड्याने दिल्या आहेत.

त्यांच्या मालमत्तांमधून मिळणाऱ्या भाड्यातून त्यांना दरमहा लाखो रुपये मिळते याशिवाय टीव्ही मालिका, रिॲलिटी शोमध्ये पाहुण्या कलाकार म्हणून लावलेली हजेरी यातून त्या चांगली कमाई केली.

फर्स्ट पोस्टच्या रिपोर्टनुसार, ३ ३ २ कोटी रुपये इतकी रेखा यांची एकूण मालमत्ता आहे शिवाय त्यांच्या मुंबईतील बँड स्टॅन्ड येथे असलेल्या बसेरा या बंगल्याची किंमत १ ० ० कोटी रुपये इतकी आहे.

असं शूट झालं शोलेमधील गाजलेलं गाणं - येथे क्लिक करा