Sandip Kapde
आपल्याला नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी नवीन गोष्टी जाणून घेण्याची आवड असते.
छत्रपती शिवाजी महाराजांचे सैनिक कसे असतील आणि त्यांना किती पगार मिळत असेल, असा प्रश्न तुमच्याही मनात कधी ना कधी आला असेल.
घोडदळातील प्रत्येक बारगीरास त्याच्या दर्जानुसार दरमहा दोन ते पाच होन पगार दिला जात असे.
शिलेदारास सहा होन ते बारा होनपर्यंत पगार मिळत असे.
जुमलेदारास अडीचशे होन दरमहा पगार तसेच पालखी व्यवस्था दिली जाई.
सुभेदारास वार्षिक सहाशे होन, पालखी, आणि दोन हजार होन वार्षिक तनखा देण्यात येत असे.
शिलेदारांचे सुभेदार वेगळे असून त्यांना सरनोबतांच्या आदेशाखाली ठेवण्यात येई, आणि पगार रोख रकमेने दिला जाई.
सैनिकांचे पगार हे ठिकठिकाणी "वराता" (चेकसारख्या प्रकाराने) पाठवून व्यापाऱ्यांकडून रोख रकमा घेऊन तो सैनिकांना देण्यात येई.
घोडेस्वारास घोडा शिवाजी महाराज पुरवून देत, आणि त्याच्या देखभालीसाठी खास खिदमतगार नेमला जात असे.
प्रत्येक घोडेस्वाराचा वार्षिक पगार ९६ ते १२० रुपये देण्याची व्यवस्था होती.
इंग्रजी साधनांनुसार, शिवाजी महाराजांचे सैन्य सुमारे पन्नास हजार घोडेस्वारांचे होते असे म्हटले जाते.
या पन्नास हजार घोडेस्वारांच्या पगाराचा दरवर्षीचा खर्च अंदाजे ४८ ते ६० लाख रुपये पडत असे.
पायदळातील सैनिकांचा पगार घोडेस्वारांच्या पगाराच्या निम्मा धरला, तर पायदळाचा खर्च सुमारे तीन लाख पंचाहत्तर हजार रुपये येत असे.
घोडदळ आणि पायदळ मिळून एकूण सैन्याचा खर्च अंदाजे त्रेसष्ट लक्ष पंचाहत्तर हजार रुपये येत असे.
या पगाराशिवाय बंदुका, तोफा, तलवारी, दारूगोळा, घोडे, तंबू व अन्य सामग्रीवर होणारा खर्च वेगळा होता.