कार्तिक पुजारी
लोकसभा निवडणुकीमध्ये एका उमेदवाराला प्रचारासाठी किती खर्च करता येतो हे तुम्हाला माहिती आहे का?
पहिल्या लोकसभा निवडणुका ते आत्ताच्या निवडणुका याकाळात प्रचारावरील खर्चामध्ये ३८९ टक्क्यांनी वाढ झाली आहे
२०२४ च्या निवडणुकीत, छोट्या राज्यातील उमेदवारांना प्रचारासाठी ७५ लाख रुपयांचा खर्च करता येईल.
तर मोठ्या राज्यातील लोकसभा लढवणाऱ्या उमेदवारांना ९५ लाख रुपयांपर्यंत खर्च करता येईल.
ज्या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, तेथील उमेदवारांना ४० लाखांपर्यंत खर्च करता येईल.
देशात स्वातंत्र्यानंतर १९५१ मध्ये पहिल्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यावेळी उमेदावाराला २५ हजार रुपयांपर्यंत खर्च करण्याची मुभा होती.
१९६७ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत ही मर्यादा कायम होती.