Monika Lonkar –Kumbhar
सध्याचे धकाधकीचे जीवन, बिघडलेला आहार आणि व्यायामाचा अभाव इत्यादी कारणांमुळे आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.
या सगळ्यात लठ्ठपणाची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मग, हे वाढलेले वजन कमी करण्यासाठी आपण नाना प्रकारचे उपाय करतो.
काही आरोग्य तज्ज्ञांच्या मते वजन कमी करण्यासाठी लिंबूवर्गीय फळे महत्वाची आहेत. या फळांमध्ये संत्रा या फळाचा समावेश आहे. वजन कमी करण्यासाठी संत्रा हे फळ अतिशय फायदेशीर आहे.
संत्र्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळून येते. शरीरातील पचनक्षमता सुरळीत ठेवण्याचे काम संत्रा करते आणि वजन कमी करण्यासाठी मदत करते.
संत्र्यामध्ये कॅलरीज कमी प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे, वजन कमी करण्यासाठी हे फळ अतिशय लाभदायी आहे. संत्र्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषकघटकांचा समावेश असतो. हे पोषकघटक आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.
संत्र्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्सचा समावेश असतो. या उच्च फायबरयुक्त संत्र्यामुळे वजन कमी करण्यास, शरीरातील चरबी घटवण्यासाठी आणि बॉडी मास इंडेक्स सुधारण्यास देखील मदत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.