Monika Lonkar –Kumbhar
मेकअप हा विषय महिलांच्या अत्यंत जवळचा विषय आहे. मेकअप करायला सगळ्यांनाच आवडतं. खास कार्यक्रमांसाठी किंवा एखाद्या पार्टीसाठी आवर्जून मेकअप केला जातो.
मेकअपमध्ये आता असंख्य गोष्टींचा समावेश होतो. काळानुसार मेकअपमध्ये अनेक प्रकारचे ट्रेंड आले आणि विविध प्रॉडक्ट्स देखील आले. यामध्ये कन्सिलरचा ही समावेश आहे.
कन्सिलर लावण्यापूर्वी सर्वात आधी तुमचा चेहरा फेसवॉशने धुवा. आता चेहऱ्याचे स्क्रबिंग करा.
त्यानंतर, टॉवेलच्या सहाय्याने चेहरा पुसून घ्या. त्यानंतर चेहऱ्याला मॉईश्चरायझर लावा आणि प्रायमर लावा.
डोळ्यांखालील काळी वर्तुळे झाकण्यासाठी ऑरेंज कलर बेस्ड असलेले कन्सिलर लावा. यासाठी पिवळ्या रंगाचे कन्सिलरही वापरू शकता. यासाठी डोळ्यांखाली एक लाईन ओढा त्यानंतर तुमच्या काळ्या वर्तुळाच्या आकाराप्रमाणे कन्सिलर गालांवर लावा. यामुळे चेहऱ्याला फूल कव्हरेज मिळेल.
आता, ब्युटी ब्लेंडरच्या मदतीने हे सर्व कन्सिलर चांगल्या प्रकारे ब्लेंड करा.
कन्सिलर ब्लेंड केल्यानंतर एक चांगल्या क्वालिटीचे फाऊंडेशन घ्या, जे तुमच्या स्किन टोनला सूट होणारे असेल.