Skin Care : पावसात भिजलायं! अशी घ्या त्वचेची काळजी

सकाळ वृत्तसेवा

Rain care

पावसाळा सुरू झाला, की पावसाळी आजारांसह फंगल इन्फेक्शनही वाढते.

skin care | Sakal

rain care

पावसात भिजल्यानंतर अनेकदा ओले कपडे अंगावर काही तास तसेच राहतात.ज्यामुळे त्वचेची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असते.

skin care | Sakal

Rain care

त्यामुळे बॅक्टेरियल आणि फंगस इन्फेक्शन पसरते. तसेच चेहऱ्यासह इतर अवयवांची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्वचा विकारतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

skin care | Sakal

rain care

पावसाळ्यात हवेत ओलावा जास्त असतो. त्यामुळे चेहरा पुन्हा स्वच्छ करावा लागतो.

skin care | Sakal

skin care

त्वचेच्या छिद्रात घाण अडकू नये म्हणून दिवसातून दोनतीन वेळा चेहरा धुणे गरजेचे असते. चेहऱ्यासाठी मॉईश्चरायझर आणि सनस्क्रीम वापरावी. याशिवाय त्वचेला पपईची पेस्ट लावल्यास चेहऱ्यावरील डाग व मुरुम कमी होतात.

skin care | Sakal

skin care

एक लहान चमचा पाण्यात लॅव्हेंडर तेल टाकून चेहऱ्याला लावल्यास त्वचेचा तेलकटपणा कमी होतो. 

care of your health in rainy season | Sakal

skin care

उन्हाळ्यात घामाने फंगल इन्फेक्शन वाढते, तसेच पावसाळ्यात त्वचा ओलसर राहिल्याने त्वचेचे आजार होतात. त्यामुळे ओले कपडे बदलणे गरजेचे आहे.

Rain Care | Sakal

पावसाळा ऋतू

पावसाळा ऋतू त्वचेच्या आजारांसाठी अनुकूल असल्याने आधी जर फंगल इन्फेक्शन झाले असेल तर त्यांना ते पुन्हा होण्याची शक्यता असते; मात्र फंगल इन्फेक्शनवर तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय उपचार करू नयेत.

skin care | sakal

foot care

पावसात खूप वेळ भिजल्यामुळे पायांना बॅक्टेरियल इन्फेक्शन होते. पायांना जळजळ होण्याचा त्रास वाढतो.

monsoon foot care | esakal

foot care

ज्यांना हा त्रास आहे त्यांनी पाय व्यवस्थित पुसणे आवश्यक आहे. पायाच्या बोटांमधील ओलावा कमी व्हावा यासाठी क्रीम दिली जाते. डायबिटीस असलेल्यांना औषधे दिली जातात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

rain care | e sakal