सकाळ डिजिटल टीम
E-Bike Battery : पेट्रोलचे दर (Petrol Price) गगनाला भिडले आहेत. दुसऱ्या बाजूला पर्यावरण संवर्धनासाठी ‘ई-बाईक्स’चा वापर गेल्या काही वर्षांत वाढला आहे.
मात्र, बाईक्समधील बॅटरी, तिच्याविषयीचे समज गैरसमज, तिची देखभाल कशी करावी, बॅटरीचे (Battery) आयुष्य कसे वाढवावे, असे विविध प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहेत.
शासनाने ‘एआयएस-१५६’ निकष ठरवून दिले आहेत. त्यानुसार ही बॅटरी बनवली जाते. त्याचे साधारणतः सात ते आठ वर्षे आयुष्य असते. वेळच्या वेळी देखभाल केली तर बॅटरीचे आयुष्य वाढण्यास मदत होते.
साधारणतः ३० ते ८० हजारांपर्यंत या बॅटरीच्या किमती आहेत. बॅटरीत आता तापमान संतुलनासह व्यवस्थापन तंत्रज्ञानही विकसित झाले आहे.
त्यामुळे पूर्वी थर्मल रन बॅटरीचे स्फोट व्हायचे, मात्र आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. त्यामुळे ९९ टक्के बॅटरीचा स्फोट होत नाही.
लिथियम हा सर्वांत हलका धातू आणि सर्वांत कमी दाट असलेला घन घटक आहे आणि २० व्या शतकाच्या उत्तरार्धात, लिथियम बॅटरीमध्ये एनोड सामग्री म्हणून महत्त्वपूर्ण बनले. घटकाची उच्च इलेक्ट्रो-केमिकल क्षमता त्याला उच्च ऊर्जा-घनतेच्या रिचार्जेबल लिथियम-आयन बॅटरीचा एक मौल्यवान घटक बनवते.