Sudesh
गेल्या काही दिवसांपासून इन्स्टाग्राम अकाउंट हॅक होण्याचं प्रमाण वाढलं आहे.
इन्स्टाग्राम अकाउंट हॅक करुन त्या माध्यमातून तुमची किंवा तुमच्या फॉलोवर्सची फसवणूक केली जाऊ शकते.
तुमचं इन्स्टा अकाउंट दुसरी एखादी व्यक्ती वापरत आहे की नाही हे तुम्ही लगेच तपासू शकता.
यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी इन्स्टाग्रामच्या सेटिंग्समध्ये जायचं आहे.
त्यानंतर अकाउंट्स सेंटरमध्ये जाऊन Password and Security हा पर्याय निवडा.
यानंतर Where you are Logged in हा पर्याय निवडा. यामध्ये तुम्ही कुठे-कुठे लॉग-इन आहात हे कळेल.
यानंतर जे डिव्हाईस तुम्हाला माहिती नाहीत त्यातून तुमचं अकाउंट लॉगआऊट करू शकता.
अधिक खबरदारी म्हणून तुम्ही आपला इन्स्टाग्राम पासवर्ड बदलू शकता.