Saisimran Ghashi
महाराष्ट्रात एकाच टप्प्यात २० नोव्हेंबरला मतदान होणार असून, मतमोजणी २३ नोव्हेंबरला होणार आहे.
मतदार यादी तपासण्यासाठी www.nvsp.in किंवा eci.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
मुख्य पृष्ठावर 'Search by Details' किंवा 'Search Your Name in Electoral Roll' या पर्यायांवर क्लिक करा.
तुमचं नाव, जन्मतारीख, आणि मतदार ओळखपत्र क्रमांक यासारखे तपशील भरून सबमिट करा.
सबमिट केल्यावर तुमचं नाव यादीत असल्यास ते स्क्रीनवर दिसेल.
तुमचं नाव यादीत आल्यास, 'Print Voter Information' वर क्लिक करून हार्ड कॉपी घेऊ शकता.
दुसरा पर्याय म्हणून, तुमच्या EPIC (मतदार ओळख क्रमांक)सह "ECI <EPIC>" या स्वरूपात मेसेज १९५० या क्रमांकावर पाठवा.
मतदानाचा हक्क बजावा आणि लोकशाही बळकट करा.