वैष्णवी कारंजकर
उन्हाळ्यात घराघरात गार पाण्यासाठी पाण्याच्या बाटल्या भरून फ्रीजमध्ये ठेवल्या जातात.
पण वापरून वापरून या बाटल्या खराब होतात.
खराब बाटल्यांमधून पाणी पिल्याने तब्येत बिघडू शकते. त्यामुळे बाटल्या साफ करणं गरजेचं आहे.
पाण्याच्या बाटल्या आतून साफ करण्याच्या काही टिप्स जाणून घ्या.
काच किंवा प्लास्टिकची बॉटल साफ करण्यासाठी त्यात गरम पाणी टाकावे.
पाणी अगदी उकळते नसावे, नाहीतर काच तडकण्याची शक्यता असते, तसंच प्लास्टिक वितळू शकतं.
गरम पाण्याने बाटली साफ केल्याने विषाणू मरतील.
२ चमचे व्हिनेगर आणि १ चमचे बेकिंग सोडा एकत्र करून बाटलीत टाकून काही वेळ ठेवा.
त्यानंतर टोपण लावून हलवून बाटली साफ करून धुवून घ्या.
१ कप पाण्यात लिंबाचा रस आणि मीठ मिक्स करून बाटलीत थोडा वेळ ठेवा.
काही वेळानंतर यात बर्फ टाकून हलवून बाटली साफ करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.