Aishwarya Musale
भारतातील अनेक जण हे मधुमेहग्रस्त आहेत. एकदा का मधुमेहाची लागण झाली तर तुम्हाला त्याच्यासोबतच जगावं लागतं.
मधुमेह असलेल्या लोकांना विशेषत: उच्च किंवा कमी ब्लड शुगरचा सामना करावा लागतो, ज्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. मधुमेह असलेल्यांनी रोज या टिप्स फॉलो केल्या पाहिजेत.
12 तासांचे फास्टिंग विंडों ठेवा. याचा अर्थ जर तुम्ही रात्री 8 वाजता जेवण केले असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता नाश्ता करा.
शरीराला हायड्रेट ठेवणे देखील महत्त्वाचे आहे. सकाळी उठल्यावर पाणी प्या आणि घरातून बाहेर पडतानाही पाण्याची बाटली सोबत ठेवा. दिवसभर पुरेसे पाणी पिणे मधुमेहामध्ये फायदेशीर आहे.
रोज पुशअप्स अप करा. हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते. रोज व्यायाम करा. चालणे, जॉगिंग आणि हलका व्यायाम कधीही चुकवू नका. यामुळे मधुमेह नेहमी नियंत्रणात राहण्यास मदत होईल.
रोज सकाळी जांभळाच्या बियांचे पाणी प्या. यात जॅम्बोलिन असते जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्याचे काम करते.
फळे, भाज्या, संपूर्ण धान्य या सर्व गोष्टींचा तुमच्या आहारात अधिक समावेश करा. तळलेल्या पदार्थांपासून दूर राहा.
टाईप २ मधुमेह असलेल्या लोकांनी दररोज सकाळी जेवण करण्यापूर्वी त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी तपासली पाहिजे. यावरून कळते की, रक्तातील साखरेचे प्रमाण किती आहे