Saisimran Ghashi
दमट हवामान आणि प्रदूषणामुळे आपल्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता होणे ही एक सामान्य समस्या बनली आहे.
व्हिटॅमिन D आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असून ते हाडांच्या आरोग्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि मूड सुधारण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते.
तर चला जाणून घेऊया की दमट हवामानात आपण व्हिटॅमिन डीची कमी कशी भरून काढू शकतो.
सूर्यप्रकाशाचा अभाव - सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डीचा सर्वात मोठा स्रोत आहे. दमट हवामान आणि प्रदूषणामुळे सूर्यप्रकाश आपल्या त्वचेपर्यंत पोहोचू शकत नाही.
आपल्या आहारात व्हिटॅमिन डी समृद्ध अन्न पदार्थ नसल्यामुळेही ही कमतरता निर्माण होते.
सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी जेव्हा सूर्यप्रकाश थोडा मंद असतो, तेव्हा थोडा वेळ सूर्यप्रकाशात बसणे.
दूध, दही, मासे, अंडी, सोया दूध, फळे आणि भाज्या यांमध्ये व्हिटॅमिन डी असते.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्स घेणे.
नियमित व्यायाम करणे शरीरातील रक्तप्रवाह वाढवते आणि व्हिटॅमिन D शोषण सुधारते.
कोणत्याही प्रकारचे बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.