Sudesh
सध्या लहान मुलांमध्ये व्हिडिओ गेम्सचं वेड पुन्हा वाढत चाललं आहे. याचे अनेक दुष्परिणाम देखील दिसत आहेत.
व्हिडिओ गेम्समुळे मुलांमध्ये चिडचिड आणि हिंसक वृत्ती वाढत चालल्याचं दिसून येत आहे.
यामुळे मुलांची झोपही कमी होत असून, खाण्या-पिण्याकडे देखील दुर्लक्ष होत असल्याचं पहायला मिळतं.
यावर उपाय म्हणून कित्येक पालक घरातील इंटरनेट काढणे किंवा गेम्स काढून घेणे असे प्रकार करतात. मात्र याचा उपयोग होत नाही.
यासाठी कठोर पावलं उचलण्यापूर्वी तज्ज्ञांशी चर्चा करून त्यांची मदत घेणं गरजेचं आहे.
मुलं गेमिंग वर्ल्डमध्ये एवढी का रमत आहेत, त्यांच्या काही अडचणी आहेत का? ते गेमिंग थांबवू शकत नाहीत का? या प्रश्नांची उत्तरं शोधणं गरजेचं आहे.
व्हिडिओ गेमचा आनंद आणि व्यसन यातील फरक मुलांना समजावणं गरजेचं आहे. यासाठीच त्यांचं समुपदेशन करणे हा उत्तम उपाय आहे.