Sudesh
अनोळखी नंबरवरुन येणारा कॉल कुणाचा आहे याची माहिती मिळवण्यासाठी कित्येक जण ट्रुकॉलर अॅपची मदत घेतात.
विशेष म्हणजे, येणाऱ्या स्पॅम कॉल्सना ब्लॉक करण्यासाठी देखील ट्रुकॉलर अॅप मदत करतं.
मात्र बऱ्याच वेळा ट्रुकॉलर एखाद्या व्यक्तीचं नाव अगदीच विचित्र दाखवतं.
कित्येक जणांनी अशी तक्रार केली आहे, की त्यांचं नाव ट्रुकॉलरवर वेगळंच दिसत आहे.
ट्रुकॉलरवरुन आपलं नाव डिलीट करायचं असेल, तर त्यासाठीची प्रक्रिया अगदी सोपी आहे
यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला ट्रुकॉलरच्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. यानंतर Unlist phone number या पर्यायावर क्लिक करा.
यानंतर तुमचा कंट्री कोड (भारताचा +91) आणि मोबाईल नंबर एंटर करा. यानंतर तुमचा नंबर काढण्याचं कारण सांगा.
यानंतर कॅप्चा कोड एंटर करून Unlist पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुमचा नंबर ट्रुकॉलर डेटाबेसमधून अनलिस्ट होईल.