Monika Lonkar –Kumbhar
मानसिक आणि शारिरीक आरोग्यासाठी नियमित योगाभ्यासाची सवय ही अत्यंत फायदेशीर असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
त्यामुळे, तुमच्या दिनचर्येत संतुलित आहारासोबतच योगाचा ही समावेश करा. योगासनांमध्ये विविध प्रकारच्या आसनांचा समावेश आहे. या आसनांच्या नियमित सरावामुळे विविध समस्यांपासून आराम मिळू शकतो.
या योगासनांपैकी एक असलेले धनुरासन हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. शरीराच्या उत्तम स्ट्रेचिंगसाठी आणि वेदनांपासून आराम मिळवून देण्यासाठी हे योगासन लाभदायी ठरते.
धनुरासन या योगासनाचा नियमितपणे सराव केल्याने मानेचा ताण कमी होतो.
पाठदुखीपासून आराम मिळवण्यासाठी हे योगासन फायदेशीर ठरते.
या योगासनाचा नियमितपणे सराव केल्याने पायांचे स्नायू मजबूत होतात.
श्वसनाच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी हे योगासन फायदेशीर ठरते.