Aishwarya Musale
फळं हे आपल्या आरोग्यासाठी किती महत्त्वाचे आहे हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. याच्या सेवनाने तर अनेक फायदे मिळतात. पण आपण फळांचा वापर स्किन केअरमध्येही करू शकतो.
पपई हे असे फळ आहे की जे खाल्ल्याने स्किनसाठीही अनेक फायदे होतात. तसेच पपई चेहऱ्यावर लावल्याने टॅनिंग दूर होते. यामुळे त्वचेवर ग्लो येतो.
पपईमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी आढळतात, जे त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. आज आम्ही तुम्हाला पपईने घरच्या घरी फेशिअल कसे करायचे ते सांगणार आहोत.
पपई फेशिअल करण्यासाठी तुम्हाला पिकलेली, रसाळ पपई घ्यावी लागेल. आता पपईचे मऊ चौकोनी तुकडे मॅश करा आणि त्याची पेस्ट तयार करा.
फेशियलसाठी तुम्हाला १ वाटी घ्यायची आहे आणि त्यात अर्धा चमचा मध घालायचा आहे. त्यात अर्धा चमचा तांदळाचे पीठ आणि अर्धा चमचा साखर घालावे.
पपईच्या पल्पपासून तयार केलेली १-२ चमचे पेस्ट घाला आणि सर्व साहित्य चांगले मिसळा. आता गुलाब पाण्याने चेहरा ओला करा.
नंतर पपईचे तयार मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि मसाज करा. १५ मिनिटे चेहरा असेच राहू द्या.
यानंतर चेहरा पाण्याने धुवा. तुमच्या चेहऱ्याला फेशियल प्रमाणे चमक येईल.
लिंबू चवीबरोबरच आरोग्यासाठीही आहे फायदेशीर, जाणून घ्या