राहुल शेळके
एटीएममधून फाटलेल्या नोटा बाहेर आल्यास काळजी करू नका, बँका त्या बदलण्यास नकार देऊ शकत नाहीत.
कोणतीही फाटकी नोट सहज बदलता येते आणि त्याबदल्यात नवीन नोट मिळवता येते.
बँका तुम्हाला फाटलेल्या नोटा बदलून देण्यास नकार देऊ शकत नाहीत.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) फाटलेल्या नोटा बदलण्यासाठी नियम तयार केले आहेत.
आरबीआय जाहिरातींद्वारे लोकांना जागरूक करत आहे.
तुम्हाला एक अर्ज लिहावा लागेल, ज्यामध्ये तुम्हाला पैसे काढण्याची तारीख, वेळ आणि ज्या एटीएममधून पैसे काढले गेले आहेत त्याची माहिती द्यावी लागेल.
RBIच्या नियमांनुसार, एक व्यक्ती एकावेळी जास्तीत जास्त 20 नोटा बदलू शकते.
नोटांचे मूल्य 5,000 रुपयांपेक्षा जास्त नसावे
बँकेत जावून नोटा बदलण्याचे काम काही मिनिटांत पूर्ण होते.