आशुतोष मसगौंडे
आजकाल प्रत्येकाकडे मोबाईल असतोच. गर्दीच्या ठिकाणी अथवा बाजारातून हातोहात मोबाईल लांबविले जातात. काही वेळा उघड्या दरवाजांतून मोबाईल चोरीला जातात.
मोबाईल हरवल्यास अथवा चोरी झाल्यास तो परत मिळू शकतो. यासाठी 'सीईआयआर' पोर्टलची निर्मिती केली आहे. नागरिकांनी 'सीईआयआर पोर्टलचा वापर करावा.
मोबाईल चोरी झाल्यास किंवा हरवल्यास सर्वांत पहिल्यांदा नजीकच्या पोलिस ठाण्यात तक्रार द्यावी.
हरवलेल्या चोरी झालेल्या मोबाईलमध्ये जे सीम कार्ड सुरू आहे, ते ब्लॉक करावे. त्याच नंबरचे दुसरे सीम कार्ड सुरू करावे.
पहिल्याच नंबरचे सीम कार्ड सुरू केल्यानंतर त्यावरूनच 'सीईआयआर' पोर्टलवर रजिस्ट्रेशन करावे.
'सीईआयआर' पोर्टलवर लॉस्ट मोबाईल लिंकवर क्लिक करा. तक्रारीची प्रत, मोबाईल खरेदीचे बिल, कोणतेही शासकीय ओळखपत्र अपलोड करा.
'सीईआयआर' पोर्टलवर आपल्या तक्रार नोंदवल्यास आपल्याला रिक्वेस्ट नंबर मिळेल. तो सेव्ह करून ठेवा. यानंतर पोलिस तुमच्या हरवलेल्या किंवा चोरी झालेल्या मोबाईलचा शोध सुरू करतील.