Saisimran Ghashi
आजच्या काळात WhatsApp हे आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनले आहे.आपण आपले मित्र, कुटुंब आणि प्रियजनांशी याच प्लॅटफॉर्मवर संपर्क साधतो.
पण तुम्हाला माहित आहे का, WhatsApp मध्ये असे सीक्रेट फीचर आहे ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचं पार्टनर कोणाशी सर्वात जास्त चॅट करतो किंवा कुणाला जास्त फोटो,व्हिडिओ पाठवतो हे सहजपणे शोधू शकता.
तुमचा पार्टनर किंवा मित्र कोणत्या व्यक्तीशी सर्वात जास्त वेळ बोलतो? तुमचा पार्टनर किंवा फ्रेण्ड कुणाला किती डेटा म्हणजेच व्हिडिओ,फोटो,मेसेज पाठवतो हे चेक करता येते.
सर्वात आधी आपल्या फोनमध्ये WhatsApp उघडा.सेटिंग्समध्ये जा.
यानंतर तुम्हाला स्टोरेज आणि डेटा सेक्शन दिसेल. या पर्यायावर क्लिक करा. येथे तुम्हाला मॅनेज स्टोरेज या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
यानंतर तुम्हाला तुमच्या सर्व चॅट्सची एक यादी दिसेल.या यादीत ज्या व्यक्तीचं नाव सर्वात वर असेल त्या व्यक्तीशी तुम्ही सर्वात जास्त चॅट केलेलं आहे किंवा ज्याला सर्वात जास्त डेटा पाठवला आहे.
WhatsApp ने नुकतंच ‘फेव्हरेट फिल्टर’ नावाचं एक नवीन फीचर लॉन्च केलं आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तींशी चॅटिंग करणं आणखी सोपे करू शकता.
तुम्ही किंवा कुणीही कोणत्या व्यक्तीला किती डेटा पाठवला आहे किंवा कुणाशी जास्त वेळ बोलणं झालेलं आहे हे समजू शकतं.कारण चॅटमुळे किती mb स्टोरेज खर्च झाले आहे ते कळते.
जर त्या व्यक्तीने सर्व स्टोरेज क्लियर केले असेल तर या फीचरचा उपयोग होणार नाही. या फीचर्सचा वापर केवळ जिज्ञासावश करा.
या माहितीचा वापर करण्यापूर्वी कृपया एकदा विचार करा. या माहितीचा गैरवापर करू नका.